“काही काही वेदनांना सांत्वनाच्या शब्दांचा भारही पेलत नाही….”
वपुंच्या या वाक्यात व्याकुळ करणाऱ्या संवेदनांची अनुभूती शब्दांकित झालेली दिसते. खरंच.. दुःखी, वेदनादायक आणि कठीण काळात आपल्याला स्वत:ला व्यक्त करण्याची गरज असते. पण, काहीवेळा आपण कोणाला दुखवू शकत नाही, त्यापेक्षा आपण स्वत: ला अधिक दुःख देत असतो आणि केवळ आपल्या भावना आपल्या हृदयात लपवल्या जातात.
जेव्हा आपले प्रियजन आपल्याला सोडतात तेव्हा खरोखर जगणे कठीण होते आणि आपण ज्या ‘क्षणाला’ एकत्र घालवला होता तो क्षण फक्त गोड आठवणी म्हणून सोडला जातो. पण, आता कल्पनाविश्व फक्त भासमान वाटायला हवं …. किडलेल्या लाकडासारखं. वास्तवाला न विसरता भविष्याची कल्पना मनात ठेवायला वेळ द्यावा लागेल …. नवीन अनोळखी माणसं सापडतील जीवनाच्या वाटेवर त्यांच्याशी मैत्रीही करावी लागेल आणि वेळ पडलीच तर संघर्षही.
तुला विसरण
मला कांही अवघड नाही ….
तू परतून पहावं
यालाही मी किंमत देत नाही.
मलाही खूप वळायचयं
वळण वेडया वाटेवरुन,
खरचं तुझ्या सांत्वनासाठी शब्द नाहीत माझ्याजवळ …
आपल्याला जे वाटते ते व्यक्त करण्यास घाबरू नका आणि आपण आपल्या मागील नातेसंबंध आणि अनुभवांवरून काय शिकलात, आपले मत दर्शवा आणि प्रत्येकाला कळू द्या की आपण खरोखर किती सशक्त आहात. दुःखावर मात करण्यासाठी आणि जीवनात पुढे जाण्यासाठी, कठिण परिश्रम प्रदान करण्यासाठी आपल्या मनपसंत, हृदयाला स्पर्श करणारे छंद, ध्येय, विरंगुळा, चित्रं आणि शब्दांची निवड करा..
काहीही कायमचे टिकणार नाही. चांगले किंवा वाईट असलेले सर्वकाही संपेल. म्हणून, आयुष्याच्या आनंदी क्षणांची काळजी घ्या आणि आलिंगन घ्या. वाईट काळांत टिकून राहा……
Leave a Reply