मराठी अभिनेते यशोधन बाळ यांचा जन्म १ मार्च १९६३ पुणे येथे झाला.
यशोधन बाळ यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे येथे, व महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज मध्ये झाले. कॉलेज मध्ये असतानाचा फिरोदिया करंडकात चमक दाखवून यशोधन बाळ यांनी अभिनय क्षेत्रात उडी घेतली. अभिनय क्षेत्रात काम करताना सुरवातीच्या काळात १९८१ ते १९९५ मध्ये केसरी, सकाळ, टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी करत होते. FTII चे नऊ चित्रपट केल्यानंतर १९९७ साली नोकरी सोडुन पुर्ण वेळ अभिनेते बनले. त्यांनी अभिनय केलेले लाईफ पार्टनर, व सूर्य पाहिलेला माणूस हि नाटके खूप गाजली.
त्यांनी आज पर्यंत ३५ हून अधिक हिंदी सिनेमे, ८ मराठी सिनेमे व ८०च्या वर जाहीराती व अनेक सिरीयल्स केलेल्या आहेत. यशोधन बाळ हे गेली १९ वर्षे सी.आय.डी मालिकेत काम करीत होते. यशोधन बाळ हे ज्येष्ठ लेखिका विद्या बाळ यांचे चिरंजीव होत. यशोधन बाळ हे जलतरण, वॉटर पोलोचे चाहते असुन त्यांनी आपल्या कॉलेज जीवनात नॅशनल मध्ये सहभाग घेतला होता. ते उत्तम ट्रेकींग करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply