यशवंतराव चव्हाण हे नाट्यगृह पुण्यातील सध्या सगळ्यात जोमाने विकसित होण्यार्या कोथरुड विभागात आहे. नाट्यगृहाचं नाव आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाणांच्या नावावरुन ठेवण्यात आले. पुण्यातील नामांकित नाट्यगृहांपैकी हे एक नाट्यगृह आहे.
इतिहास :
या वास्तूच्या कोनशिलेचा समारंभ २८ ऑक्टोबर १९८६ रोजी झाला. कोनशिला उद्घाटन समारंभ सोहळा माजी मुख्यमंत्री सन्मा. शंकरराव चव्हाणांच्या हस्ते करण्यात आला. शनिवार २५ नोव्हेंबर २००० रोजी नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटन सोहळा सन्मा. विजयसिंह मोहिते पाटील (तथाकालित PWD Minster) यांच्या हस्ते करण्यात आला होता.
नाट्यगृहाचा वापर हा नाटकांपुरता मर्यादित नसून येथे अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक, चर्चासत्रांचे कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. नाट्यगृहाची आसन क्षमता ८३९ आसनांची असून त्यातील ४३६ प्रेक्षागृहाच्या खालील भागात तर उर्वरित १५७ आसनं बाल्कनीत आहेत. मुख्य रंगमंचाचा आकार ६०’ * ४०’ असून त्यातील ३०’ * २०’ इतकाच भाग वास्तविकपणे वापरण्यास मिळतो.
नाट्यगृह हे सोयीसुविधांनीयुक्त आहे. कलाकारांसाठी येथे रहाण्याची व उत्तम खाण्याचीही सोय होत असून प्रेक्षकांसाठी येथे उपहारगृह उपलब्ध आहे. पैसे भरुन वाहनांंना वाहनतळावर उभं करता येते. अतिमहत्वाच्या व्यक्तींकरिता कक्ष उपलब्ध आहे.
वास्तूत विशेष पहाण्यासारखे :
वास्तूत एक आकर्षक कलादालन असून येथे नेहमी चित्रकार आपल्या चित्रांचे, छायाचित्रकार आपल्या छायाचित्रांचे व हस्तकौशल्यकार आपल्या हस्तकलेचे प्रदर्शन भरत असते.
पत्ता : डी. पी. पथ, छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, कोथरुड, पुणे – ४११०३८
संपर्क : ०२० २५३९५३२
— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक)
Leave a Reply