परवा गावात मोडक्या वडाकडे… म्हणजे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक मिटींग घेतली गेली… सर्वपक्षीय.. गावातल्या जुन्या जाणत्यानी बोलवलि… विषय… गावातल्या रस्त्यांची परिस्थीती, आणि ऊपाय… सगळ्यानी आपआपली मतं मांडली… कॉन्ट्राक्टर लॉबीन हिरहिरीन मांडले की रस्ते करतांना गावची सगळी मंडळी समोर असते … आणि काम पाऊस पडापर्यंत चोख आसता . एक पण खड्डा नसतो… आता पाऊसच जास्त तर आम्ही तरी काय करणार ?
मन्या घोगळ्याचो पकलो म्हणता माका बोलाचा हा…. सरपंचान गप बस, अस सांगितलं पण… पण तो काय ऐकेना… शेवटी म्हातार्या बाबीन परवानगी दिल्यान… बोल काय ता…….
पकल्यान सुरू केल्यान…. मंडळी मी ह्या रस्त्याच्या दुखण्याचो अभ्यास केलय…. आणि ऊपाय पण शोधलय….. आणी तो पण बिनखर्चाचो..
फुकट ऊपाय आणि ईतक्या मोठ्या समस्येवर ?….. सगळ्यानी कान टवकारल्यानी…. तरी बाबी बोल्लोच….. मायझया कायय सांगशित तर व्हानेन मारीन… सरळ सांग. आणि कसा ता सांग…
पकलो म्हणालो… मी सांगलेला नाय पटला तर जुत्यान मारा माका सगळ्यानी….
एकच ऊपाय रॉकेल पिवळा व्हया
असो प्रत्तेक गावान ग्रामसभेत ठराव घालुक व्हयो….. आणी शासनान निळ्या एेवजी पिवळा रॉकेल देवक व्हया….. आणि त्यानंतर होणारे रस्ते बघा पावसातय व्हावाचे नाय…… काळ्यात निळा मीसाळला तर समाजना नाय…. त्यामुळे पेट्रोलात जाऊचा बंद झालेला रॉकेल डांबरात मिक्स होता़. पिवळा रॉकेल झाला तर रस्तो पिवळो… दुसर्यादिवशी लोक काय करूचा ता करतले….
बाबीन पाठी बगल्यान तर सगळे कॉन्ट्राक्टर गायब… मगे विषय समाजलो… कायतरी रॉकेल मुरता ह्या खरा…. मग १५अॉगस्ट च्या ग्रामसभेत विषय घ्यायचा ठरला आणि सभा संपली….
१५ अॉगस्ट च्या ग्रामसभेक पकलो सोडुन सगळे हजर…. चौकशी केल्यावर समाजला ह्या मिटींगच्या नियोजनाची पार्टी होती रात्री… थयसून पकलो टाईट होऊन ईलो तो ऊटाकच नाय दिवसभर…..
बाकी तुमी शाने आसातच……
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे….
Leave a Reply