फोर्ब्स या मासिकाने जगातील अब्जाधीशांची यादी प्रसिध्ध केली आहे. या मध्ये Dustin Moscovitz चा उल्लेख जगातील सगळ्यात तरुण अब्जाधीश म्हणून केला आहे. हा पण फेसबुकच्या संस्थापकांपैकी एक आहे. कॉलेजमध्ये तो मार्क झुगेर्बार्ग चा रूम पार्टनर होता. तो मार्क पेक्षा ८ दिवसांनी लहान आहे. त्यामुळे जगातील सर्वात तरुण अब्जाधीश हा पण एक फेसबुकवालाच असावा हा फेसबुकच्या शिरपेचातील एक मानाचा तुराच आहे.
नुकतीच अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी फेसबुकला भेट दिली आणि अख्खा दिवस तेथे घालविला. अमेरिकेच्या अध्यक्षाने एखाद्या कंपनीत आख्खा दिवस घालविणे ही घटना अमेरिकेच्या इतिहासात अभूतपूर्व मानली जाते. सन २०१२ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी बराक ओबामा पुन्हा उभे राहणार आहेत. त्यावेळी निवडणूक प्रचारासाठी त्यांना फेसबुक चा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे म्हणून ही भेट होती. याचा अर्थ फेसबुक चे महत्व आता अमेरिकन अध्यक्षांपर्यंत पोचले आहे.
जे फेसबुक चे सभासद आहेत. जे याचा नियमितपणे वापर करीत आहेत. ज्यांची फेसबुक वर श्रद्धा आहे. ज्यांना फेसबुक विषयी प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा आहे. त्यांना वरील माहिती नक्कीच स्पृहणीय वाटेल म्हणून ही माहिती शेअर करत आहे.
उल्हास हरी जोशी
May 4, 2011 ·
Leave a Reply