माझ्या दृष्टीकोनातून… होय मी सुरक्षित आहे
(१)कारण मीच होईन माझा आधार
(२)कारण मीच आहे सक्षमतेची मुर्ती
(३)कारण मी प्रत्येक क्षेत्रात पाय रोवून उभी आहे
(४)कारण चूल आणि मूल या पलीकडे जाऊन मी आर्थिक क्षेत्रात खंबीर आहे
(५)कारण वैचारिक स्थित्यंतरात,स्वातंत्र्य लढ्यात,मुक्त वैचारिक आंदोलनात माझा सहभाग नोंदवला गेला.
(६)कारण मी सबल आहे आणि असणारच.
(७)कारण जगभर बदलणारे वैचारिक प्रवाह मी जाणून घेते.
(८)कारण अधिकार प्राप्तीसाठी मी चळवळ करते.
(९)कारण मला निर्णयाचं स्वातंत्र्य आहे.
(१०)कारण मी लढवय्यी आहे.
(११)कारण मी माझ्या कुटुंबाचा खंबीर आधार आहे.
(१२)कारण आज माझ्यामुळेच कुटुंबसंस्था टिकून आहे.
(१३)कारण माझ्या घरातील पुरुषांमधे स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन उदात्त केला आहे.
(१४)कारण कायद्याने मला आज स्वच्छंदी आकाश मिळालं आहे.
(१५)कारण मला सुसंस्कारांच बाळकडू मिळालं आहे
(१६)कारण माझ्या जवळ वाक्चातुर्य आहे.
(१७)कारण माझ्याजवळ प्रसंगावधानता आहे.
(१८)कारण मी माझ्या मर्यादा ओळखून प्रगती साधणार आहे
(१९)कारण माझ्या जवळील बुद्धिचातुर्य मी अबाधित ठेवलं आहे
(२०)कारण माझ्या अभागी भगिनिंवर आलेल्या दुर्दैवी प्रसंगातून मी स्वत:ला सावध करते,प्रसंगी माघार घेण्यात धन्यता मानते.
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply