येतात तुझे आठव,
डोळ्यांत काळे ढग,
उरांत फक्त पाझर,
शिवाय नुसते रौरव ,–!!!
येतात तुझे आठव ,
होते सरींची बरसात,
चित्तात उठे तूफान”,
मनात चालते तांडव,–!!!
येतात तुझे आठव,
प्रीतीचे हे संजीवन ,
स्मृतींचे मोठे आवर्तन,
त्यांचे लागती न थांग,—!!!
येतात तुझे आठव,
सरींची त्या उधळण,
शब्दांचे पोकळ वाद,
कल्पनांचे नुसतेच डाव,–!!!
येतात तुझे आठव,
अश्रू असूनही शुष्क,
मन मात्र पाणथळ,
कसानुसा होई जीव,–!!!
येतात तुझे आठव,
भोवती दुःखाची पाचर,
सहवासाचे अमृतथेंब
, कधी बनती विष:कण,–!!!
येतात तुझे आठव,
प्रेमाचे निव्वळ भास,
आत्म्यात फक्त उलघाल,
काट्यांची बनते शेज,–!!!
येतात तुझे आठव,
कधी येईल राघववेळ,
कुशीत तुझ्या शिरून,
संपवेन दुर्भाग्याचा खेळ,–!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply