येतात तुझे आठव, गगनात काळे ढग,
उरांत फक्त पाझर,
शिवाय नुसते रौरव,–||१||
येतात तुझे आठव,
सयींची होते बरसात,
चित्तात उठे तूफांन,
मनात चालते तांडव,–||२||
येतात तुझे आठव,
प्रीतीचे हे संजीवन,
स्मृतींचे मोठे आवर्तन,
त्यांचे लागती न थांग,–||३||
येतात तुझे आठव,
सरींची त्या उधळण,
शब्दांचे पोकळ वाद,
कल्पनांचे नुसते डांव,–||४||
येतात तुझे आठव,
अश्रू असूनही शुष्क,
मन मात्र पांणथळ,
कसानुसा होई जीव,–||५||
येतात तुझे आठव,
भोवती दुःखाची पाचर,
सहवासाचे अमृतथेंब,
कधी बनती विष:कण,–||६||
येतात तुझे आठव,
प्रेमाचे निव्वळ भास,
आत्म्यात फक्त उलघाल, काट्यांची बनते शेज,–||७||
येतात तुझे आठव,
कधी येईल राघववेळ,
कुशीत तुझ्या शिरून,
संपवेन दुर्भाग्याचा खेळ,–||८||
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply