बिकमनचा जन्म पॅरिस येथे ७ जानेवारी १९११ रोजी झाला.लहानपणी त्यांचे कुटुंब लंडन येथे स्थायिक झाले. शाळेत शिकत असताना तिचे इंग्रजी फ्रेंच व जर्मन वर प्रभुत्व होते. इंग्लंड मध्ये शिक्षण झाल्यावर तिला स्विस स्कूल मध्ये धाडण्यात आले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिला वुमन एअर फोर्स मध्ये पाठवण्यात आले.तिला तेथे रेडियो ऑपरेटरचे प्रशिक्षण देण्यात आले.कारण तिचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व होते. बिकमन १५ फेब्रुवारी १९४३ रोजी एसओई मध्ये भारती झाली.तिने सार्जंट जाप बिकमनशी १९४३ मध्ये लग्न केले. त्याच्याशी तिची प्रशिक्षणाच्या वेळी ओळख झाली.पण ते थोडेच दिवस टिकले. १७ सप्टेंबर १९४३ रोजी ती युद्धविमानातून फ्रांसमध्ये दाखल झाली. फ्रांसमध्ये ती रेडियो ऑपरेटर म्हणून काम करू लागली. ती शेतकऱ्यांच्या नेटवर्कच्या मेसेजसाठी काम करू लागली. ती कामात तरबेज होतीच आता ती दोस्त राष्ट्रांनी विमानातून टाकलेल्या सामानाच्या वाटपाचीसुद्धा कामे करू लागली. सुरवातीच्या काळात ती शिक्षकाकडे paying guest म्हणून राहात होती.नंतर ती गुपचुप गुप्तहेर गोंबेकच्या घरी जाऊ लागली.तिथून ती हेरगिरीचे काम करू लागली. पुढे ती अनेक गुप्त ठिकाणाहून काम करू लागली.पुढे तिचे काम अधिक धोकेदायक होऊ लागले. जर्मन तिचे संदेश पकडण्याचा धोका वाढला.तिची धाडसी वृत्ती एसओई साठी फायद्याची होती.दुर्दैवाने ती पकडली गेली.आणि तिची रवानगी फ्रान्सिस् तुरुंगात झाली. ती रक्ताने टॉयलेट पेपरवर लिहून गुप्त संदेश पाठवू लागली. पुढे तिला डच यातनातळावर पाठवण्यात आले. तिथे तिचा ११ सप्टेंबर १९४४ रोजी मृत्यू झाला.
–रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply