नवीन लेखन...

युती आणि आघाडी

विधानसभा, लोकसभा, महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणूका जवळ आल्या की युती आणि आघाडी या दोन शब्दांची कधी नाही तेवढी चर्चा सुरु होते. चर्चेची गुर्‍हाळं सुरु होतात. युती झाली, युती मोडली, आघाडीत बिघाडी, महायुतीत महाफूट.. यासारख्या मथळ्यांनी रोजचे पेपर भरुन जातात.

युती, आघाडी हे काही भारतीयांना नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक युत्या-आघाड्या अगदी रामायण-महाभारतापासून आपल्याकडे होतच आल्या आहेत.

रामायणात रामाने वानरसेनेबरोबर केली ती युतीच….
महाभारतात श्रीकृष्णाबरोबर पांडवांनी केली तीसुद्धा युतीच….

संगीतक्षेत्रात शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी युती करुनच अनेक चांगल्या गाण्यांना जन्म दिला. आजही अजय-अतुलसारख्या युत्या आपल्या कानांना रिझवत आहेत.

उद्योग-व्यवसायातही अनेक भारतीय कंपन्यांनी परदेशी कंपन्यांशी युती केली. सरकारी “मारुती”ने जपानच्या सुझुकीबरोबर केलेल्या युतीची फळं आपण अजूनही चाखंतोय. व्हिडिओकॉन वगैरेसारखे ब्रॅंड परदेशस्थ कंपन्यांशी युती करुनच मोठे झाले.

औषध निर्मितीतही युत्या आणि आघाड्या आहेत. तशा त्या सगळ्याच क्षेत्रात आहेत. युती आणि आघाडी या शब्दांचा आपल्यावर एवढा पगडा आहे की विमानसेवा, विमाव्यवसाय, वृत्तपत्रे या सगळ्यात सध्या परदेशी कंपन्यांशी युत्या आणि आघाड्या झाल्याच आहेत.

तसं तर बैलगाडीची बैलजोडी ही पण युती आणि घोडागाडी किंवा पूर्वीच्या काळातले राजेमहाराजांच्या रथाचे घोडे हे तर युती-आघाडीचे घटकपक्ष.

निवडणूका आल्या की हे बैल, घोडे इत्यादि चर्चेला बसतात. कोणाला कोणाबरोबर आघाडी करता येईल, कोणाशी युती केली तर सत्ताप्राप्ती होईल याच्यावर खल सुरु होतो. एकमत काही होत नाही.

मग स्वबळ अजमावलं जातं. स्वबळावर निवडणूका लढवल्या जातात. ५-१० वर्षे सत्तेत किंवा विरोधात एकत्र बसूनही निवडणूक काळात एकमेकांची उणीदुणी, उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात. चिखलफेक होते.

सगळं करुन निवडणूक सरते.. निकाल जाहिर होतात… कोणालाच बहुमताचा जादुचा आकडा गाठता येत नाही. मग पंचाईत होते. शेवटी पुन्हा युती आणि आघाडीच कामाला येते.

— निनाद अरविंद प्रधान 

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..