झाड आहे झुकलेले,
कमरेत थोडे वाकलेले ,
असून इतके बहरलेले,
लीन होऊन सदैव नमले,
किती पाहिले पावसाळे,
केवढे उन्हाळे सोसले,
शिशीरी गारठून गेले,
हेमंती पुन्हा सावरलेले,
केवढी वादळे, वारे आले,
पावसात झाड भिजले,
तरीही निश्चल खडे राहिले,
कुणी आले घांव घातले,
नाग सापांचे विळखे पडले,
मुंग्यांनी बुंध्याला वारूळ केले,
झाड निमूट स्थिर राहिले,
कोणी तोडली त्याची पाने,
कोणी ओरबाडली फळे,
कधी झाड मुळात हलले,
कधी कडक उन्हात चटकले,
थंडीत झाड कसे शहारले,
तरीही अचल कसे राहिले,
पक्ष्यांनी त्यावर घेतले आसरे,
बांधून आपापले घरटे,
पिल्लांना जिवापाड सांभाळले, आजोबाचे कर्तव्य निभावले, पांथस्थ कुणी खाली थांबले, घटकाभर सावलीत विसावलेले, झाड छाया — दाते म्हणून,
कोणी, हळूच कुरवाळले,
निरंतर चालू झाडाची कर्तव्ये, *कोणी निंदले अथवा वंदले,
झाड आहे ते झुकलेले,—-!!!
झाड आहे ते झुकलेले—!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply