नवीन लेखन...

झाड म्हणालं…

मोठया प्रमाणात निसर्गवैविध्य जपणारा आपला देश आणि आसपासचा परिसर साधारण सारख्याच जातकुळीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृध्द आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात, नैसर्गिक पध्दतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे स्थानिक किंवा देशी वृक्ष अशी सोप्पी व्याख्या आपण करू शकतो. हे असे देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात. ह्या देशी झाडांमुळे अन्न, वस्त्र व निवारा ह्या मानवी गरजा पुऱ्या होण्यास मदत होतेच, त्याशिवाय पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो. या झाडांच्या सहकार्याने जगणारे अनेक जीव ‘एकमेकां साह्य करू’ उक्तीनेच जणू जगत असतात. देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो. विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते.

उपयोग

झाड आपल्याला आवश्यक असा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देतात. ऑक्सीजन मिळाला नाही तर आपण जगणार तरी कसे. पृथ्वीवरील सजीवांचे जगणे कठीण होईल. झाडं तोडली तर प्रदुषण वाढेल. त्यामुळे पृथ्वीवरील तापमान आणखी वाढेल. त्यामुळे बर्फ वितळेल. जमिनीची धूप होईल. पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात येईल.

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले गेले आहे, ते त्याच्या औषधी गुणधर्मामुळे. आयुर्वेदामध्ये अनेक झाडांचा आणि वनस्पतींचा वापर केला गेला आहे. झाडांमुळे जमिनीची धुप होत नाही. झाडांमुळे अन्नसाखळी निर्माण होते व ती टिकून राहते.

१ पर्यावरण दिनाला झाडे लावायला हवीत असे आपण अनेक ठिकाणी ऐकतो, वाचतो. आता शहरी वातावरणात इमारती आणि दुचाकींच्या गराड्यात राहणाऱ्या आपल्याला झाडे लावायची खूप इच्छा असते पण ती कशी आणि कुठे लावावीत याबाबत आपल्याला माहित नसते. ज्येष्ठ अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांनी कुठे कोणती झाडे लावता येतील याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, मंदिराभोवती वड, उंबर, पिंपळ ही झाडे लावल्यास चांगली. उद्यानात पारिजातक, करंज, चिंच, सप्तपर्णी, शिसव ही झाडे लावू शकता. हवा स्वच्छ ठेवतील अशी झाडे पळस, गुलमोहर, कदंब, पेरु, बोर, कडूनिंब, आवळा, बेल, जांभूळ, आवळा इत्यादी.

२ प्लास्टीकबंदी जाहीर होऊनही आपल्यातील अनेक जण सर्रास प्लास्टीकच्या पिशव्या, चहाचे ग्लास आणि इतर अनेक गोष्टी वापरतात. मात्र प्रत्येकाने आपल्यापुरते तरी मी प्लास्टीक वापरणार नाही असे ठरवल्यास मोठ्या प्रमाणात प्लास्टीकचा वापर कमी होऊ शकतो.

३. सध्या शहरात आणि ग्रामीण भागातही दुचाकी आणि चारचाकी वापरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशिष्ट शहरातील प्रदुषणाची आकडेवारी पाहून आपण तेवढ्यापुरते आश्चर्य व्यक्त करतो, मात्र पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे होऊन जाते. त्यामुळे वाहतुकीच्या सार्वजनिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करा. तसेच शक्य असेल त्याठिकाणी चालत जा. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होऊन पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल.

४. घरातील ओला कचरा साठवून त्यापासून खतनिर्मिती करता येते. त्याविषयी हल्ली अनेकठिकाणी सहज माहिती मिळते. सोसायटीमध्ये एकत्रित मिळून हा प्रकल्प करता येतो. अन्यथा अगदी लहानशा जागेतही हा प्रकल्प करणे शक्य आहे. त्यामुळे घरच्या घरी खत तयार करुन कुंडीतील फुलांच्या रोपांसाठी हे खत तुम्ही वापरु शकाल.

५. येत्या काळात जे युद्ध होईल ते पाण्यावरुन असेल असे आपल्या कानावर पडत आहे. त्यामुळे आपल्या देशात, राज्यात आणि गावात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी पाण्याचा जपून वापर करा. अनावश्यक ठिकाणी पाणी वापरु नका. वीजेच्या बाबतीतही ही गोष्ट लागू होते. वीजनिर्मितीची प्रक्रिया खर्चिक आणि दिर्घकालिन असल्याने तसेच त्याचे स्त्रोत मर्यादीत असल्याने वीजेचाही जपून वापर करा.

— दिनेश दिक्षित 

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..