झाडांची आज चालली रंगपंचमी गाली हसे नभ,
विविध रंग पाहुनी कुणी आणे हिरवा तर कुणी गुलाबी
कुणी गडद, कोणी लालेलाल झाला
बुंध्यापासून कोणी हळदी ल्यालेला
कुणी केशरट रंगाने अगदी न्हालेला
कोणता अधिक सुंदर ते विचार करे
माझा रंग बिनतोड’, ते पक्के ठरवे
मागे मी, म्हणून यांचे हे सौंदर्य,–
निसर्गघटक कितीतरी, असती,
कोण दाखवेल असे औदार्य,–?
एकट्या मला या जगी तोड नसे,
कुणी कोणतेही रंग आणो,
निळ्या नभाला तर ‘होड” नसे,–!!
रंग माझे बदलती, नेहमी
रंग पांढरे, काळसर,केशरी,
रंगतदार सूर्योदयी, सूर्यास्ती,
धुळवड खेळतो रोज मी,–
सांगा कोणता रंग नसतो,
इंद्रधनुष्याची पहा ना जादू,
रंग सारे उतरती खाली,
धरतीला घालती न्हाऊ,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply