झरा वाहतो पाषाणातून, भोवती सारे खडक,
निसर्गाच्या सान्निध्यात,
झरणे त्याचे बेधडक,
निर्धास्त तो उगमापासून,
चोखाळत आपली वाट,
निखळ निर्मळ निरामय,—
सारखा पुढे पुढे धावत,–!!!
भीती ना कुठली अंतरात,
सहजी अगदी नाचत उडत कठीण त्या दगडांमधून,
उत्फुल्ल होऊन मार्ग काढत,
रेषा बिंदूंच्या साऱ्या रेखित, मार्गक्रमण करत ठराविक,
तुषार कुठले मोती ठरत,
शुभ्र पांढरे आणि सफेत,
झुळुझुळु सारखा आवाज करत, गात आपुली जीवनधून,–!!!
वृक्षवल्लीला चैतन्य देत, कर्तव्याचा मार्ग अंगीकारत,
ना कुठला ताणतणाव,
संताप, विषाद अनावृत्त,
निधान त्याचे फक्त आनंद दुसऱ्याला जगवत जगवत,
सदैव चैतन्याचे उधाण,
न अचेतनाची ओढ,
वाहातच सारा जन्म,
आपल्या धुंदीत केवळ मस्तीत–!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply