नवीन लेखन...

झी समूहाचे चेअरमन सुभाषचंद्र गोयल

झी समूहाचे चेअरमन सुभाषचंद्र गोयल यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९५० रोजी हरियाणा राज्यातील हिस्सार या गावी झाला.

हरियाणाच्या एका छोट्या खेडेगावातील एक मुलगा भारतातील पहिल्या १८ श्रीमंतांत केवळ पाच दशकांत भरारी मारतो हे अविश्वसनीय सत्य प्रत्यक्षात उतरवणारे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे सुभाष चंद्र गोयल.

त्यांना भारतातील मीडिया सम्राट म्हणूनही ओळखले जाते. १७ व्या वर्षी खिशात फक्त सतरा रुपये असताना शिक्षण अर्धवट सोडून वडिलांच्या तोट्यात गेलेल्या व्यवसायाला पुन्हा उभे करण्याची जिद्द बाळगून त्यांनी आपल्या उद्योजकीय कामगिरीला सुरुवात केली. काही वर्षांतच सगळी देणी फेडून कंपनी कर्जमुक्त केली. दशकभरात आपल्या व्यवसायाला १०० कोटी रुपयांच्या उद्योगात बदलले. आज ESSEL Group या भारतासह जगभरात विस्तारलेल्या, विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या उद्योगसमूहात त्याचे रूपांतर केले. आजघडीला त्यांची वैयक्तिक संपत्ती ६३ हजार २०० कोटी रुपये इतकी आहे. एखाद्याला अडथळा वाटणाऱ्या आणि वेळोवेळी येणाऱ्या अडचणींचा त्यांनी संधी मानून समर्पक उपयोग करून घेतला. मग ती वडिलांच्या व्यवसायाची दिवाळखोरी असो, अर्धवट सोडून दिलेले शिक्षण असो किंवा पुढे उद्योगात आलेले अडथळे असोत. उद्योगवृद्धीचा त्यांनी सातत्यानं ध्यास घेतला. त्यातून विविध क्षेत्रांत उच्चपातळी गाठलेले २० हून अधिक उद्योग त्यांनी उभे केले. ज्यात विविधता, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांनी केलाय.

आपल्या घराण्यातील सर्वात ज्येष्ठ घटकाचे कर्तव्य म्हणून त्यांनी परिवारातील साऱ्या सक्षम मंडळींना उद्योगविश्वात स्थान दिले. जिथे गरज भासेल तिथे संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करून व्यावसायिकताही जपली. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून त्यांच्या उद्योजकीय कर्तृत्वाची दखल घेतली. अर्थात संपत्ती वाढवणे हे सुभाषचंद्रांनी आपले जीवितकार्य मानले नाही. विपश्यना या संकल्पनेचा त्यांनी प्रसार केला. त्यासाठी त्यांनी आपल्या एस्सेल वर्ल्डमध्ये मुंबईला स्तूपही बांधला. मुलांसाठी किड झी, झी लर्न आणि ब्रेन ट्रस्ट ऑफ इंडिया हे उपक्रमही ते राबवतात. आपल्या झी चॅनेलवर तरुण वर्गासाठी समुपदेशन करतात. एकल विद्यालय फाउंडेशनमार्फत आदिवासीबहुल क्षेत्रात काम करतात. हिसार हा त्यांच्या हरियाणातील भागाचं त्यांनी राज्यसभेत काही काळ प्रतिनिधित्वही केलं आहे.

सुभाष चंद्र गोयल यांच्या जीवनावर लेखक सुधीर सेवेकर यांनी माध्यमसम्राट सुभाषचंद्र गोयल हे पुस्तक लिहीले आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..