नवीन लेखन...

झिगार्निक परिणाम

आपलं आयुष्य म्हणजे एक प्रकारचा खेळ आहे. मेंदू हा या खेळाचा नियंत्रक आहे पण खेळात सहभाग दिसतो तो शरीराचा. मनाची भूमिका दिसत नाही.

आपले शिकणे या जगात आल्यापासून सुरू होते ते शेवटच्या क्षणापर्यंत चालते. शिकलेल्या गोष्टी आपल्या मेंदूत साठविल्या जातात स्मृतींच्या रूपात. काही गोष्टी दिर्घकाळ स्मरणात राहतात. ज्या काही विसरल्या जातात ती असते विस्मृती. मनातल्या स्मृती-विस्मृतींवर आपले आयुष्य पुढे सरकते.

आपण तीन प्रकारच्या स्मृतींचा आधार घेतो. तात्कालिक, अल्पकालीन व दीर्घकालीन. ज्ञानेंद्रियांकडून आलेले संदेश तात्कालिक असतात व ते एक सेकंदापेक्षा कमी काळ टिकतात. काही गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात. या दोन्हींच्या मधे असते अल्पकालीन स्मरण. अल्पकालीन स्मरणासाठी जागा कमी असल्यामुळे मारामारीचे प्रसंग सतत घडत असतात.

अनेक कामे एका वेळी करीत असल्यास त्या कामांचा मागोवा ठेवणे सर्वांना जमते असे नाही. एक काम झाले की अल्पकालीन स्मरणातील माहिती पुसून टाकली जाते (Delete). नवीन काम त्या जागी येते. नुकत्याच झालेल्या कामाचा लवलेशही रहात नाही. हे स्वाभाविक आहे. याचा अनुभव सर्वांना आलेला असतो.

  • दार उघडून घरी आल्यावर किल्ली बाहेरच लटकत राहते व नंतर आपण घरभर शोधतो. दार उघडताच ‘घरात जाणे’ ही कृती पूर्ण झाल्याने अल्पकालीन स्मरणातून निघून जाते व किल्ली काढायची राहते.
  • रिक्षा प्रवास नीटपणे संपताच आपण रिक्षाचा नंबर विसरतो. काही उपयोग नसतो स्मरणातील जागा अडवण्याचा. पण रिक्षात काही विसरल्यास तो नंबर आठवत नसल्याची बोच राहते.
  • फोटोकॉपी काढल्यावर ती घेऊन मूळ प्रत विसरून जाणारेही असतात. कारण’ झेरॉक्स काढणे’ हे काम अल्पकालीन स्मरणातून लगेच निघून जाते.

‘आपला मेंदू पूर्ण झालेली कामे अल्पकालीन स्मृतीतून काढून टाकतो.’ याला म्हणतात ’ झिगार्निक परिणाम’ (Zeigarnik Effect). ब्लूमा झिगार्निक या रशियन मानसोपचारतज्ञ महिलेने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला.

हॉटेलमधील वेटरबाबतचा तिचा अनुभव संशोधनाला चालना देणारा ठरला. जेवणासाठी तिच्या मैत्रिणींसोबत ती हॉटेलमधे गेली होती. काहीही न लिहिता ऑर्डर घेणे, सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची डिश आणून ठेवणे, बिल तयार करणे वगैरे, त्या वेटरची सर्व कृती अचंबित करणारी होती. जॅकेट विसरल्याने ब्लूमा मधूनच परत फिरली आणि त्या हॉटेलमधे गेली. तिने वेटरला शोधले व तो मदत करू शकेल असे तिला वाटले. पण त्या वेटरने तिला ओळखलेही नाही. तिच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. काही मिनिटांपूर्वीचा वेटर तो हाच का? असा प्रश्न ब्लूमा झिगार्निकला पडला. टेबल रिकामे झाले की वेटर सर्वकाही ताबडतोब विसरतो. बरोबर आहे, नवीन कस्टमरसाठी अल्पकालीन स्मृती (Reset) पूर्ववत करावीच लागते. या घटनेने झिगार्निकला संशोधन करायला उद्युक्त केले.

Zeigarnik Effect व्यवहारात पुढीलप्रमाणे दिसून येतो.

  • टीव्हीवरील मालिकांचा भाग संपवताना अपूर्णतेची जाणीव प्रेक्षकांना होईल हे पाहिले जाते. यामुळे मालिकेचा पुढील भाग ते आठवणीने पाहतात.
  • हल्ली ATM मधून आधी कार्ड काढावयास सांगितले जाते व नंतर पैसे घेण्याची सूचना येते. कारण ’पैसे मिळाले की काम झाले’ अशा मूडमधे कार्ड घेण्यास ग्राहक विसरू शकतो.

मी त्याचा असा उपयोग करतो. लेख लिहून पूर्ण झाल्यावर मी ‘रिलॅक्स्ड’ मूडमधे असतो. पण त्याआधी पुढील लेखाची सुरुवात करून ठेवतो. त्यामुळे ते काम शेवटपर्यंत माझ्या स्मरणात राहते. ‘लिखाण संपले’ अशी स्थिती येऊ देत नाही.

कसा वाटला Zeigarnik Effect?

— रविंद्रनाथ गांगल

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..