झुला तुझ्याच आठवांचा
झुलतो, अजूनही अंतरी
व्याकुळ! मन गलबलते
निष्पाप! प्रीती हृदयांतरी
सांग नां! कसे गं विसरू
तुझेच रूपडे मनगाभारी
आज माहोल तोच सारा
त्याच विश्वेश्वराच्या मंदिरी
तीच संथ शांत कृष्णामाई
अजूनही वाहते गं निरंतरी
तूं सात्विक सुंदरा लाघवी
जलकुंभासवे उभी किनारी
मनी अक्षय निर्मळ भावप्रीत
हरवलीस जरी तूं आजवरी
साक्षी! राऊळीचा नंदादीप
लोचनां दीपवितो गं निरंतरी
©️ वि.ग.सातपुते.( भावकवी)
9766544908
रचना क्र. १०४.
९ – ८ – २०२१.
Leave a Reply