माउंट वेई
दक्षिण चीनमधील माउंट वेईचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. येथे प्राचीन काळातील अनेक मंदिरे, शिलालेख पाहायला मिळतात. पहिल्या शतकातील हान राजवटीच्या खुणा येथे दिसतात.
दक्षिण चीनमधील माउंट वेईचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. येथे प्राचीन काळातील अनेक मंदिरे, शिलालेख पाहायला मिळतात. पहिल्या शतकातील हान राजवटीच्या खुणा येथे दिसतात.
उत्तर इटलीमद्ये असणारे टेट्रो थिएटरचे बांधकाम १५८० ते १५८५ या काळात झाले. आंद्र पलाडिया याने याची रचना केली. मात्र, याचे उद्घाटन पलाडियाच्या मृत्यूनंतर ३ मार्च १५८५ ला झाले.
टेंपल ऑफ हेवन हे मंदिर बीजिंग शहरात आहे. इ.स. १४२० ला या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मोंग आणि क्विंग या राज्यकर्त्यांचे वारसदार या मंदिरात चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात.
ऑस्ट्रेलियातील फ्रासर बेट हे जगातील सर्वांत मोठे वाळूचे बेट आहे. या बेटाचा विस्तार १ लाख ८४ हजार हेक्टर उतका आहे. स्फटिकासारख्या सुंदर पाण्याचे तलाव या बेटावर आढळतात.
माउंट वुताई हा चीनमधील बौध्द धर्मातील लोकांसाठी पवित्र डोंगर आहे. येथे असलेल्या ४० मठांमध्ये बुध्दांच्या ५०० मूर्ती व चित्रांचा समावेश आहे. पाच शिखरांचा डोंगर असेही याला म्हटले जाते.
अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.
स्पेनमधील क्युनका हे गाव डोंगरातील दगडांवरील विशिष्ट प्रकारच्या घरांसाठी प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात हे गाव वसविण्यात आले. याची रचना आणि त्याचा ऐतिहासिक ठेवा स्पेनने जपला आहे.
व्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.
आईसलॅंडमधील सुर्त्से बेट हे १९६३ ते ६७ या काळात ज्वालामुखी उद्रेकानंतर तयार झाले आहे. मानवविरहित असणारे हे बेट शास्त्रज्ञांसाठी प्रयोगशाळाच बनले आहे.
बुल्गेरियातील रिला मॉनस्ट्री (मठ) चा शोध १०व्या शतकात सेंट जॉन यांना लागला. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या मठाची १८३४ ला पुनर्बांधणी करण्यात आली. मठाचे आध्यात्मिक क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions