सध्या शेतकरी आत्महत्या, शेतकर्यांचा संप वगैरेमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे.
एकूण लोकसंख्येपैकी तब्बल ६० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. यातील ९० टक्के लोकसंख्या म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. यात शेतमालक, शेतमजूर व शेतीला अन्य प्रकारे मदत करणार्यांचा समावेश आहे.
शेतीच्या विकासासाठी सरकारने अनेक योजना आखल्या. मात्र राज्यातील शेतकरी अजूनही आत्महत्या करतच आहेत. कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकर्याला कर्ज घ्यायलाग लागू नये अशी कोणाचीच इच्छा दिसत नाही कारण तसे झाले तर राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांची दुकानेच बंद होतील.
Leave a Reply