प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात होता. १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. चांदा जिल्ह्यासही पुढे ‘चंद्रपूर’ जिल्हा या नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः नवव्या शतकात या प्रदेशावर प्रथम नागवंशीय राजांची व त्यानंतर गोंड राजांची सत्ता होती असे लिखित इतिहासात आढळते.
चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला.
Leave a Reply