तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी – मराठी विश्वकोशाचे संस्थापक. त्यांची मुख्य ओळख कोशकार, साहित्यिक आणि प्राच्यविद्या पंडित अशी करून देता येईल. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथे झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे ते वीस वर्षे अध्यक्ष होते. आधुनिक मराठी साहित्य, समीक्षा आणि रससिद्धांत, वैदिक संस्कृतीचा विकास हे त्यांचे काही महत्त्वाचे साहित्य होय.
रघुनाथ बाळकृष्ण केळकर – मराठीतील आद्य व्यंगचित्रकार रघुनाथ बाळकृष्ण केळकर यांचा जन्म धुळे येथे झाला. १९२९ च्या सुमारास किर्लोस्कर मासिकात त्यांचे पहिले व्यंगचित्र छापून आले. आज त्यांची चित्रे जगभरातल्या अनेक संग्रहालयात आहेत.
जनार्दन महाराज वळवी – हे आदिवासींच्या उन्नतीसाठी आजही झटणारे समाजसेवक होत. यांचा जन्म धुळे जिल्ह्यात मुंदलवड येथे आदिवासी कुटुंबात झाला. त्यांनी १९६३ मध्ये सातपुडा शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने ‘दलित मित्र’ आणि ‘आदिवासी सेवक ’ या किताबांनी त्यांना सन्मानित केले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासींचा सर्वांगीण विकास या सूत्राच्या आधारे ते कार्य करीत आहेत.
कै. श्री. शंकर श्रीकृष्ण देव – यांचा जन्म धुळ्याचाच. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिलेल्या शिवथरघळ या ठिकाणचा शोध १९३० मध्ये यांनी लावला.
अभिनेत्री स्मिता पाटील – प्रसिध्द हिंदी व मराठी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिरपूर या गावी झाला.
Leave a Reply