पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. जिल्ह्यात सुमारे ३.९५ लाख हेक्टर कृषीयोग्य जमीन आहे. भुईमुग हे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हा जिल्हा राज्यातील भुईमुगाच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. तसेच ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, उडीद, मिरची, तीळ, कापूस, गहू, ऊस व मूग ही पिके देखील जिल्ह्यात घेतली जातात. केळी, पपई, पेरू, खरबूज यांसारख्या फळांचेही उत्पादन येथे होते.
Leave a Reply