पुणे हे पेशवाईपासून बागांसाठी प्रसिद्ध शहर आहे. पेशवाईत पुणे शहराच्या आसपास किमान डझनभर बागा होत्या. त्यातील काही आजही आहेत तर काहींची फक्त नावेच शिल्लक आहेत.
पुणं म्हटलं की पहिली आठवते ती सारस बाग. मात्र याशिवाय हिराबाग, मोतीबाग, माणिक बाग, रमणबाग, कात्रजची बाग, रानवडी बाग इत्यादिही प्रसिद्ध आहेत.
याशिवाय पुण्यात जिजामाता बाग, बंड गार्डन, संभाजी उद्यान, कमला नेहरू उद्यान ही ठिकाणेही सकाळ सध्याकाळ गजबजलेली असतात.
Leave a Reply