सातारा हे कृष्ण- वेण्णेच्या संगमावर वसलेले ऐतिहासिक शहर आहे. महाराणी ताराबाईच्या कारकिर्दीत सातारा मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. सातारा शहर पुणे -बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे शहर डोंगर -टेकड्यांनी वेढलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ मध्ये या शहरातील अजिंक्य तारा या किल्ल्यावर ताबा मिळविला. अजिंक्य तारा हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधल्याची नोंद नोंद आहे. इ.स. १७०८ मध्ये शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक याच शहरात झाला होता.
एकेकाळी मराठा साम्राज्यांची राजधानी असलेल्या सातारा शहराला सात टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. सातार्याला शाहू नगरी म्हणूनही ओळखले जाते.
Leave a Reply