ब्रिटिश काळात १८५४ साली सुरू झालेली ही सेवा आजही अविरतपणे सुरू आहे. त्याकाळी सर्वसामान्यांचे पोस्टाशी जुळलेले नाते आजही तसेच टिकून आहे. आधुनिकतेच्या युगात सुमारे १६० वर्षे हे नाते जपले जात आहे,
भारतीय टपाल खात्याचे जाळे जगातील सर्वात मोठे असून देशभरात १ लाख ५५ हजारांपेक्षा अधिक टपाल कार्यालये आहेत. यापैकी १ लाख ३९ हजारांपेक्षा अधिक (८९.७६) टक्के कार्यालये ग्रामीण भागात आहेत.
सुरुवातीला पत्रांची देवाणघेवाण करणे एवढाच व्यावसायिक दृष्टीकोन डोळ््यासमोर ठेवून काम सुरू होते. २००५ साली ‘बिझनेस डेव्हलपमेंट’ची निर्मिती करण्यात आली आणि टपाल खात्याने कात टाकली. भेटकार्ड विकणे, इमामीचे प्रॉडक्ट वाटणे, यांसारखी सेवा देत टपाल खात्याने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. ग्रामीण भागात महावितरणची वीजबिलदेखील स्वीकारण्याचे काम टपाल खात्याकडून सुरू आहे. टपाल खात्यातील अन्य सुविधांमध्ये स्पीड पोस्टचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
Leave a Reply