डॉमिनिका

डॉमिनिका हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. हा देश कॅरिबियन समुद्रामध्ये ग्वादेलोपच्या दक्षिणेस व मार्टिनिकच्या उत्तरेस ७५० चौरस किमी क्षेत्रफळाच्या बेटावर वसला असून २००१ साली येथील लोकसंख्या केवळ ७१,२९३ इतकी होती. रुसाउ ही डॉमिनिकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

क्रिस्तोफर कोलंबसने हे बेट ३ नोव्हेंबर १४९२ रोजी शोधुन काढले व त्याला ह्या दिवसाचे (रविवार, लॅटिनमध्ये: dominica) नाव दिले. त्यानंतर अनेक शतके येथे फारशी वस्ती नव्हती. फ्रान्सने १७६३ साली हे बेट ब्रिटनच्या स्वाधीन केले. ब्रिटनने येथे एक छोटी वसाहत स्थापन केली. ३ नोव्हेंबर १९७८ रोजी डॉमिनिकाला स्वातंत्र्य मिळाले. सध्या डॉमिनिका राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे सांसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. ह्या भागातील प्रजासत्ताक असणाऱ्या कमी देशांपैकी डॉमिनिका एक आहे.

येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटन हा डोमिनिकामधील सर्वात मोठा उद्योग आहे. येथील दरडोई उत्पन्न कॅरिबियनमधील इतर देशांच्या तुलनेत बरेच कमी आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : रुसाउ
अधिकृत भाषा : इंग्लिश, फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस : ३ नोव्हेंबर १९७८ (युनायटेड किंग्डमपासून)
राष्ट्रीय चलन : पूर्व कॅरिबियन डॉलर

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*