टोगो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. टोगोच्या पश्चिमेला घाना, पूर्वेला बेनिन, उत्तरेला बर्किना फासो तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. लोम ही टोगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे टोगो गरीब व अविकसित आहे.
टोगो हा देश १८८४ पर्यंत अशांती व दहोमी या दोन सैनिकी राज्यांमध्ये वसलेला होता. १९८४ मध्ये टोगोलँड जर्मनीचा एक भाग बनले. १९२२ मध्ये लीग ऑफ नेशन्सने पूर्व टोगोलँड फ्रान्सला आणि पश्चिम टोगोलँड ब्रिटनच्या स्वाधीन केले. ब्रिटिश आणि फ्रेंच सरकारकडून टोगोला संयुक्त राष्ट्रसंघ विश्वस्तपदाचा दर्जा बहाल करण्यात आला. १९६० मध्ये टोगोला स्वातंत्र्य मिळाले. १९९२ मध्ये बहुपक्षीय घटनेला मान्यता मिळाली. मात्र, राजकीय परिस्थिती अस्थिरच राहिली.
राजधानी व सर्वात मोठे शहर :लोम
अधिकृत भाषा :फ्रेंच
राष्ट्रीय चलन :पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply