त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.
इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर कोलंबस येथे पोचल्यापासून १७९७ सालापर्यंत त्रिनिदाद बेट स्पेनची वसाहत होती. १९व्या शतकामध्ये त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन्ही बेटांची मालकी ब्रिटिश साम्राज्याकडे आली. ब्रिटनपासून १९६२ साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९७६ साली त्रिनिदाद व टोबॅगो प्रजासत्ताक अस्तित्वात आले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असलेल्या ह्या देशामध्ये पेट्रोलियम व रासायनिक हे प्रमुख उद्योग आहेत. कॅरिबियनमधील एक श्रीमंत व समृद्ध देश मानला जाणाऱ्या त्रिनिदाद व टोबॅगोमधील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅरिबियन परिसरामध्ये सर्वाधिक आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :पोर्ट ऑफ स्पेन, चाग्वानास
अधिकृत भाषा :इंग्लिश
राष्ट्रीय चलन :त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply