तुर्कस्तान (तुर्की :Türkiye) किंवा टर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये (युरोप व आशिया) विस्तारित आहे. अंकारा ही तुर्कस्तानची राजधानी आहे तर इस्तंबूल हे त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.
तुर्कस्तानचे नाव, तुर्की भाषेमध्ये Türkiye (तुर्किए) यावचे दोन अर्थ होऊ शकतात: १. ‘तुर्क’ याचा अर्थ जुन्या तुर्की भाषेमधे शक्तिशाली असा होतो. २. तुर्कस्तानच्या नावाची फोड तुर्कि-एन आहे. त्याचा अर्थ : तुर्की म्हणजे तुर्की लोक, एन म्हणजे त्यांच्या मालकीचे आहे असा होतो. यावरून तुर्कस्तानला हे नाव पडले असावे.
तुर्कस्तान नैर्ऋत्य आशियातील अनातोलियाच्या द्वीपकल्पावर पसरलेला आहे. या देशाचा थोडासा भाग आग्नेय युरोपमध्येही आहे.
तुर्कस्तानच्या वायव्येस बल्गेरिया, पश्चिमेस ग्रीस, ईशान्येस जॉर्जिया, आर्मेनिया व अझरबैजान तर पूर्वेस इराण आणि आग्नेयेस इराक व सीरिया हे देश आहेत. तुर्कस्तानच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र, पश्चिमेस एजियन समुद्र व उत्तरेस काळा समुद्र आहे. मार्मराचा समुद्र तुर्कस्तानच्या आशियाई व युरोपीय भागांच्या मध्ये आहे.
तुर्कस्तानमध्ये ८१ प्रांत आहेत. प्रत्येक प्रांत अनेक जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. तुर्कस्तानमध्ये असे एकूण ९२३ जिल्हे आहेत.
या ८१ प्रांतांची ७ विभागात विभागणी केलेली आहे परंतु हे विभाग फक्त जनगणनेच्या सोयीसाठी केलेले आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :अंकारा, इस्तंबूल
अधिकृत भाषा :तुर्की
राष्ट्रीय चलन :नवा तुर्की लिरा (TRY)
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply