युक्रेन हा पूर्व युरोपातील एक देश आहे. युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
नवव्या शतकात निर्माण झालेले क्यीवन रुस हे राज्य मध्य युगादरम्यान एक बलाढ्य राष्ट्र होते. १९व्या शतकामध्ये युक्रेनचा मोठा हिस्सा रशियन साम्राज्याच्या तर उर्वरित भाग ऑस्ट्रिया-हंगेरीच्या अधिपत्याखाली होता. पहिल्या महायुद्धा व रशियन यादवीनंतर ३० डिसेंबर १९२२ रोजी सोव्हियेत संघामध्ये सामील होणारा युक्रेन हा आघाडीचा देश होता. तेंव्हापासून १९९१ सालामधील सोव्हियेत संघाच्या विघटनापर्यंत युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य हे सोव्हियेत संघातील एक आघाडीचे गणराज्य होते. २४ ऑगस्ट १९९१ रोजी युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले.
राजधानी व सर्वात मोठे शहर :क्यीव
अधिकृत भाषा :युक्रेनियन, रशियन, क्राइमियन तातर
राष्ट्रीय चलन :युक्रेनियन रिउनिया (UAH)
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply