आंध्र प्रदेशातील तिसरे मोठे शहर म्हणून विजयवाडा ओळखले जाते. हे शहर रस्ता, हवाई मार्ग आणि रेल्वे अशा तीन मार्गानी जगाशी जोडलेले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे जंक्शन येथे आहे. कृष्णा नदी या शहरातूनच वाहत पुढे जाते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी या शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम प्रसिद्ध आहे
शिक्षणाचे माहेरघर
कनकदुर्गा मंदिर, गुंडाला मेरीमटा चर्च ही विजयवाडा येथील दोन प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथे अनेक नामवंत शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत म्हणूनच या शहराला ‘विद्या वाडा’ असेही म्हणतात.
Leave a Reply