गुरुवायूर हे केरळ राज्यातल्या त्रिसूर जिल्ह्यातील एक शहर तसेच दक्षिणेतील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे असणारे प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर हे देशातले चौथे मोठे मंदिर आहे. देशविदेशातील हजारो भाविक येथे भेट देतात.राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ या शहराजवळून जातो. त्रिसूर येथून या शहरात रेल्वेनेही जाता येते. कोची येथून गुरुवायूरला बसने जाता येते.
दक्षिणेतील द्वारका
गुरुवायूर या शहराला भाविक ‘दक्षिणेतील द्वारका’ असेही म्हणतात. २६ जानेवारी १९६२ रोजी गुरुवायूरला शहराचा दर्जा प्राप्त झाला. हा विधानसभेचा मतदारसंघ असून, त्याचा त्रिसूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो.
Leave a Reply