कोट्टायम हे केरळ राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात रबराची मोठी बाजारपेठ आहे. मल्ल्याळम मनोरमा, दीपिका व मंगलम या मोठ्या वर्तमानपत्रांची मुख्यालये या शहरात असून, त्यामुळेच या शहराला अक्षरनगरी असेही म्हणतात. या शहरात छपाई उद्योगाशी संबंधित अनेक संस्था कार्यरत आहेत.
१०० टक्के साक्षर शहर
कोट्टायम हे शहर केरळ राज्यातील पहिले १०० टक्के साक्षर शहर आहे. १९८९ मध्येच या शहराला हा बहुमान लाभलेला आहे. त्याचबरोबर १०० टक्के तंबाखूमुक्त शहर असाही बहुमान या शहराला २००८ मध्ये प्राप्त झालेला आहे.
Leave a Reply