एर्नाकुलम हे केरळ राज्यातल्या कोची शहराचे जुळे शहर आहे. एर्नाकुलमला ‘केरळची आर्थिक राजधानी’ असे म्हणतात. राज्य सरकारची अनेक कार्यालये या शहरात असून, केरळ हायकोर्ट, स्टॉक एक्स्चेंजही याच शहरात असल्याने येथे लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. जुन्या कोचीन संस्थानची एर्नाकुलम ही राजधानी होती..
शिव मंदिराच्या नावावरून पडले नाव
एर्नाकुलम परिसरातील ‘एर्नाकुलतपन मंदिर’या प्रसिद्ध शिव मंदिराच्या नावावरून या शहराचे एर्नाकुलम हे नाव पडलेले आहे. दक्षिण भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या शहरांपैकी हे एक असून, येथे वर्षभरात ३००० मि.मी. पावसाची नोंद होते.
Leave a Reply