
अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील युको बॅंक ही देशातील पहिली दरवाजा नसलेली बॅंक आहे. या बॅंकेच्या सुरुवातीलाच दोनशे खाती उघडली गेली आहेत. शनि शिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. त्यामुळे या गावातील बॅंकेलाही दरवाजा ठेवण्यात आलेला नाही. भक्तांच्या श्रध्देला तडा न जाऊ देता युको बॅंकेने पहिल्यांदाच दरवाजा नसलेली बॅंक उघडली आहे.
शनि देवावर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळेच या गावातील कोणत्याही घराला दरवाजे किंवा कडी-कुलुप नाही. या श्रद्धेमुळे आजच्या काळातही ही परंपरा ग्रामस्थ तंतोतंत पाळतात. या गावाच्या २ किमीच्या परिसरात घरांना, दुकानांना, शाळेला दरवाजे नाहीत.
Leave a Reply