विदर्भात अमरावती आणि नागपूर हे दोन विभाग आहेत. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत २१.३ टक्के वाटा विदर्भाचा आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली हे जिल्हे विदर्भात येतात.
भौगोलिकदृष्ट्या विचार केला असता, महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी ३१.६ टक्के भूभाग विदर्भात येतो.
विदर्भात नागपूर हे सर्वाधिक मोठे शहर असून, त्यापाठोपाठ अमरावती आणि अकोला ही शहर आहेत.
महाराष्ट्रातील एकूण खनिज संपत्तीमध्ये विदर्भाचा दोन तृतियांश आणि वनसंपदेमध्ये तीन चतुर्थाश वाटा आहे तथापि गरिबी आणि कुपोषणाचे प्रमाण विदर्भात जास्त असून उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा आर्थिक विकास कमी प्रमाणात झालेला आहे.
राज्य सरकारचे विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्वतंत्र विदर्भाची हाक वेळोवेळी देण्यात आली. मात्र यावर अद्यापही चर्चा आणि वादविवाद सुरुच आहेत.
२००१ च्या जनगननेनुसार विदर्भात हिदूंची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्या खालोखाल बौध्द धर्मियांचे वास्वव्य असून, मुस्लिम समाज तिसर्या क्रमांकावर आहे.
Leave a Reply