मुंबईतली आरे कॉलनी ही एकेकाळी मुंबईचं वैभव मानली जात असे. आशिया खंडातील सर्वात सुंदर बंगला आणि विश्राम गृहाचा मान आरे पार्ककडे होता. पूर्वी शाळांच्या सहलींसाठी हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण होते.
मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर आरे गावाजवळ हा पार्क आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर आणि मनाला आनंद देणार्या आरे पार्कने राज्याच्या लौकिकात भर टाकली आहे.
आरे कॉलनीतील एकूण क्षेत्रफळ हे ९०० हेक्टर असून यात फिल्मसिटी, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प योजना, महानंदा डेअरी, फोर्स वन, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, म्हाडा कॉलनी आदी बांधकामे आहेत.
मुंबईच्या विस्ताराबरोबरच येणार्या मेट्रोसारख्या प्रकल्पांमुळे आता आरेच्या सौंदर्याला बाधा येऊ शकते कारण मेट्रोसाठी कारशेड येथे बनवण्याची चर्चा सुरु आहे. आरे कॉलनीतून ‘मेट्रो ३’ जाणार असून गोरेगाव-मुलुंड जोडमार्गाचेही काम पालिकेतर्फे हाती घेण्यात येत आहे.
Leave a Reply