जालना हा कृषिप्रधान जिल्हा असून, दोन्ही हंगामात घेतले जाणारे ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. करडई उत्पादनाच्या दृष्टीने हा जिल्हा महत्त्वपूर्ण ठरतो. अंबड,जालना व परतूर ह्या तालुक्यात करडईचे उत्पादन अधिक प्रमाणावर घेतले जाते.जिल्ह्यातील खरीप पिके म्हणजे ज्वारी, बाजरी, कापूस, मूग, तूर, उडीद, भुईमुग. गहू, ज्वारी, करडई ही रब्बी पिके होत.
महाराष्ट्रात मोसंबीखाली सर्वांत जास्त क्षेत्र (७,१६९ हेक्टर) जालना जिल्ह्यात आहे. तसेच ऊस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे बागायती पीक आहे. अंबड व परतूर तालुक्यांत ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शिवाय डाळिंब, केळी, द्राक्षे आदी बागायती पिकेही जिल्ह्यात घेतली जातात.
Leave a Reply