भात’ हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. लागवडीखालील एकूण जमिनीपैकी साठ टक्क्यांहून अधिक जमीन भाताखाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात डोंगरउतारावर नाचणीचे पीक घेतात. संगमेश्वर व चिपळूण हे तालुके नाचणीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.दापोली, गुहागर, राजापूर या काही भागात वरईचे उत्पादनही घेतले जाते. आंबा, फणस, काजू, नारळ, रातांबे व सुपारी ही जिल्ह्यातील प्रमुख फळपिके आहेत. रातांब्यापासून कोकमचे फळ मिळते. याच कोकमपासून आमसुले तयार होतात. मत्स्यशेतीचा विचार करता कोळंबीची शेती येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. जिल्ह्यातील सिट्रानेला गवत प्रसिद्ध आहे. यापासून तेलाची निर्मिती केली जाते.
Leave a Reply