पश्चिम महाराष्ट्रातील सातारा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मराठेशाहीच्या काळात सातारा हे राजधानीचे ठिकाण बनले होते. महाराणी ताराबाई यांच्या काळात येथूनच राज्यकारभाराची सूत्रे हलत.
शिलहार वंशातील राजा दुसरा भोज याने इ.स.११९० मध्ये येथे अजिंक्यतारा हा किल्ला बांधला. २७ जुलै १६७३ रोजी छत्रपती शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. १३ एप्रिल १७०० रोजी हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. सन १७०८ साली छत्रपती शाहुमहाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच आहे. येथून संपुर्ण सातारा शहराचे दर्शन होते. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील चंदनवंदन किल्ले, यवतेश्वराचे पठार, कल्याणगड आणि सज्जनगड हेसुद्धा दिसते.
महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाणे याच सातारा जिल्ह्यात आहेत.
Leave a Reply