अमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी मानली जाते. अर्थात लांबीनुसार नाही.. तर तिच्यातून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहानुसार. प्रति सेकंदाला तिच्यातून तब्बल १,२०,००० क्युबिक मीटर्स पाणी वाहत असते.
लांबीनुसार अमेझॉन जगातली दुसरी लांब नदी ठरते. हिची लांबी आहे ६,४०० कि.मी. म्हणजेच नाईलपेक्षा जेमतेम ३०० किलोमीटर कमी.
दक्षिण अमेरिकेतील पेरु देसातील अंडेस पर्वतातून उगम पावणारी ही नदी पेरु, ब्राझिल, व्हेनेझुएला, इक्वेडोर आणि बोलिव्हिया या देशांचा प्रवास करुन ऍटलांटिक समुद्राला मिळते.
अमेझॉन नदीबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या नदीवर एकही पूल बांधलेला नाही. नदी ओलांडण्यासाठी फेरीचा वापर केला जातो.
अमेझॉनच्या थक्क करुन टाकणार्या प्रवासाची एक झलक पहा..
Leave a Reply