अमरावती हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील ८० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासींची आहे. तसेच या परिसरात कोलाम, बसोडे, गोंड, माडिया-गोंड, ढाणका यांसारख्या आदिवासी जमातींचेदेखील वास्तव्य आहे. घराच्या मागील बाजूने बाहेर पडण्याची पद्धती या लोकांमध्ये आढळते. भात हे त्यांचे मुख्य अन्न होय.
भाताला ते ”बाबा चावळी’ असे म्हणतात. ”ढेमसा’ हे गोंडांचे काठीनृत्य, ”गावबांधणी’ हे कोलाम जमातीचे पारंपरिक नृत्य व माडियांचे ”रेला’ हे नृत्य ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये आजही जपलेली आढळतात.
Leave a Reply