अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे महत्वाचे स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर ओझर येथे आहे. कुकडी नदीच्या काठावरील विघ्नेश्वराचे हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या सोंडेची असून ती स्वयंभू आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत.
विघ्नेश्वराचे हे मंदिर भव्य आणि सुंदर असून त्यासभोवती दगडी तट आहे. मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत.
पुणे नाशिक रोडवरील नारायणगावपासून ८ कि.मी. अंतरावर ओझर हे क्षेत्र आहे. ओझर हे पुण्याहून ८५ किमी तर मुंबईहून १८२ किमी. आहे. जुन्नर ते ओझर अंतर साधारण ८ ते १० कि.मी. असून एस.टी. तसेच इतर वाहनांची सोय आहे.
महाद्वारातून आत गेल्यावर दोन उंच दीपमाला आहेत. प्रवेशद्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदीराची मूर्ती आहे आणि भिंतींवर चित्रकाम केलेले आहे.
थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
Leave a Reply