
ता. कर्जत जि. रायगड
मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत रेल्वेस्टेशन आहे. तेधून ८ किमी. अंतरावर कडाव गांव आहे. कर्जतहून कडावला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे.
गावचे धुळे पाटील यांना शेत नांगरताना बरीच मोठी जानवे घातलेली दगडी गणेश मूर्ती सापडली.सुमारे ३८. वर्षापूर्वीची ही घटना. प्राचीन काळी मूर्तीची स्थापना कण्व मुनीनी केली असे म्हणतात.
नाना फडणीसांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला. या मंदिरासाठी पेशव्यांनी तीन एकर जमीन इनाम दिली.
सध्या पुन्हा मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. मूर्ती प्रसन्न असून लवकर भक्तांना पावणारी आहे. हे एक जागृत गणेशस्थान आहे.
Leave a Reply