बासर हे आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील एक शहर असून ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावात सरस्वतीदेवीची वालुकामय मूर्ती असलेले प्रसिद्ध मंदिर आहे. बासर रेल्वेस्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर व्यास सरोवराच्या काठावर हे पुरातन मंदिर आहे. या मंदिराशेजारीच महर्षी व्यासांचे प्राचीन मंदिरही आहे.
विद्येचे माहेरघर
लहान मुलांना शाळेत घालण्यापूर्वी बासर येथील सरस्वतीदेवीसमोर पाटीपूजन करण्याचा येथे प्रघात आहे. खास यासाठी दूरचे लोक येथे येतात. मंदिराजवळच वेदवती नावाची एक शिळा असून, तिच्यावर वेगवेगळ्या बाजूंनी – आघात केल्यास वेगवेगळे ध्वनी निर्माण होतात.
Leave a Reply