बेलिझ

बेलिझमध्ये इ.स. ९०० पर्यंत ‘माया सी’ जमातीचे वास्तव्य होते. १६व्या शतकात स्पॅनिशांनी बेलिझवर ताबा मिळविला. सतराव्या शतकात ब्रिटिश लाकूडतोड्यांनी बेलिझमध्ये प्रवेश केला. १८५९ मध्ये ब्रिटिश व ग्वाटेमाला यांच्यातील तहाची पूर्तता न झाल्याने ग्वाटेमालियन लोकांचा बेलिझवर हक्क प्रस्थापित झाला.

१८८१ मध्ये बेलिझचे स्वातंत्र्य मान्य केले असले, तरी ग्वाटेमालाने १९९१ मध्ये बेलिझला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता दिली.

बेलिझंची किनारपट्टी- बेलिझची किनारपट्टी ही जैवविविधतेने समृद्र किनारपट्टी आहे. मॅग्रूव्ह वने, मासे, मगरी आणि जलचर प्राण्यांच्या विविध जमातीमुळे या किनारपट्टीची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*