बेल्लारी हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्वाचे शहर आहे.
या शहराच्या नावाबाबत एक दंतकथा पुढीलप्रमाणे सांगितली जाते. प्राचीनकाळी या परिसरात राहणार्या बल्ला नावाच्या एका राक्षसाचा देवांचा राजा इंद्राने वध केला . संस्कृत भाषेत अरीचा अर्थ शत्रू असा होतो. बल्लाचा शत्रू म्हणजेच बल्ला अरी याचा अपभ्रंष होत सध्याचे बेल्लारी हे नाव पडले आहे.
बेल्लारी हे ग्रॅनाईट खडकांचे आगर मानले जाते. या शहरापासून अगदी जवळ असलेल्या बेल्लारी गुडा आणि कुंभारा गुडा या दोन डोंगरात मोठ्या प्रमाणात ग्रॅनाईटन खडक मिळतो.
येथील किल्ला, प्राणि संग्रहालय, योगिनी कोल्हापुरी महालक्ष्मी मंदिर, दुर्गम्मा मंदिर आदी स्थळे प्रेक्षणीय आहेत.
Leave a Reply