भंडारा जिल्ह्यांतील महत्त्वाचा रस्ता म्हणजे हाजीरा-धुळे-कोलकाता.(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६)जो भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी येथील महामार्ग व लोहमार्ग महत्त्वपूर्ण ठरतात. ही गरज लक्षात घेता १८८२ साली मुंबई-नागपूर-कोलकाता हा जिल्ह्यातून जाणारा पहिला लोहमार्ग सुरू करण्यात आला. या लोहमार्गावर भंडारा रोड, तुमसर रोड (प्रमुख जंक्शन) ही महत्त्वाची स्थानके आहेत. नागपूर-चंद्रपूर लोहमार्ग पवनी तालुक्यातून गेला आहे.
Leave a Reply