बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश मंदिर असे म्हणतात. खांबाशिवाय उभारलेल्या या गणेश मंदिराच्या प्रशस्त सभा मंडपावरून त्याला हे नांव पडले आहे.

मूर्ती प्राचीन असून इ.स. १८८२ मध्ये बापूराव वाईकरांच्या विहीरीच्या दुरुस्तीच्या वेळी ती सापडली. तेव्हा कोल्हापुर छत्रपती व करवीरकरांनी मंदिर बांधले.

संगमेश्वराचे बाळ जोशीराव हे प्रसिद्ध ज्योतिषी होते. त्यांना छत्रपती राजाराम यांनी इसवी १६९५ – ९६ मध्ये योगक्षेत्रासाठी इनाम दिले. पुढे ताराबाईच्या कारकीर्दीत कोल्हापुरास ते आले व छत्रपतीचे ‘जोशीराव बनले.

हे प्रसिद्ध जोशीराव या मंदिराजवळ रहात म्हणून या गणपतीस जोशीराव गणपती असेही म्हणतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*