बोकाघाट

आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यातील एक शहर बोकाघाट. जगातील वारसा हक्क यादीत समाविष्ट असलेला काझीरंगा नॅशनल पार्क या शहरापासून अवघ्या २३ किलोमीटरवर आहे.

बोकाघाट हे आसाम राज्याचे मध्यवर्ती शहर असून, या शहराच्या नावाने स्वतंत्र उपविभाग आहे. समुद्रसपाटीपासून २४९ फूट उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या ८८४४ इतकी आहे.

बोकाघाट शहरापासून अनेक पर्यटनस्थळे जवळ आहेत. काकोचांग धबधबा हे या परिसरातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून, ते या शहरापासून अगदी जवळ आहे.

येथील दीओ पर्वत, हातीकुली येथील चहाच्या बागा तसेच रबर व कॉफीचे मळे देशभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*